Thursday, July 2, 2009

भगतसिंग सुटकेची मागणी करणे मी हीनपणाचे समजतो....


सविनय निर्बंधभंगाच्या आंदोलनानंतर गांधींजी व्हाइसरॉयसमवेत बोलणी करण्यासाठी १७ फेब्रुवारीस (१९३१) जाणार, गांधी आयर्वीन करार होणार असे प्रसिद्ध झाले. या करारावरील गांधींची स्वाक्षरी महत्वपूर्ण होती. चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांचा बाबाराव सावरकरांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. भगतसिंग तर अवघ्या क्रांतिकारकांचे भूषण होते. बाबाराव सावरकरांनी भगतसिंग आदींची फाशी रद्द होण्यासंदर्भार पुष्कळ खटपट चालविली. बाबारावांनी गांधींची जाऊन भेट घेतली.

बाबाराव गांधींना म्हणाले, " आपण उद्या दिल्लीला जाणार आहात.आपला व्हाइसरॉयशी करार होईल. अशावेळी राजबंद्यांच्या मुक्ततेची पहिली अट असते, ती आपण घालावी."

गांधी म्हणाले, "मी ती अट घालणार आहे. ते माझे कर्तव्यच आहे."

त्यावर बाबाराव म्हणाले,"पण राजबंद्यात क्रांतिकारी वा अहिंसावादी असा भेद केला जाऊ नये. जगात कोठेही असा भेद केला जात नाही."

तेव्हा मात्र गांधींजींनी आपले खरे अंतरंग दाखविले. ते म्हणाले, " हे पाहा सावरकर, माझे धोरण असे आहे की, प्रतिपक्ष जे देणे शक्य आहे, तेवढेच मागून समाधान मानावे. अत्याचारी (?) लोकांना सरकार सोडणार नाही, हे जर निश्चित माहीत आहे, तर त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात काय अर्थ आहे ?"

बाबारावांनी मग स्पष्टपणे त्यांना सांगितले, "हे आपले धोरणच मला योग्य दिसत नाही. कारण मग स्वराज्याची मागणी तरी कशी करता येईल इंग्रज ते देणारच नाहीत. आपण आपले इकडचे तिकडचे फालतू आधिकार मागावेत."

या युक्तिवादावर गांधी गप्पच झाले. पण मग थोड्या वेळाने बाबारावांना म्हणाले, "हे पाहा, अत्याचारी लोकांना सोडा म्हणणे हे हीनपणाचे आहे. ते मी करणार नाही. माझ्या अहिंसेच्या ब्रिदाविरूद्ध मी कसा जाऊ ?"

गांधींचे असे खरे स्वरूप बाहेर येताच बाबारावांनी त्यांना फटकारले, " मग स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणार्‍या अब्दुल रशीदसाठी हिंदूंना नि स्वामीजींच्या चिरंजीवांना, भाई अब्दुल रशीदला क्षमा करा म्हणून तुम्ही म्हणालात, तो हीनपणा नव्हता का ? तोच हीनपणा शस्त्रधारी राजबंद्यांसाठी का करीत नाही ?"

या रोखठोक प्रश्नाला गांधींकडे उत्तर नव्हते. मग आपणास जणू कोणी आतून हाक मारीत आहे, अशा अविर्भावात, 'हो, आलोच,' करीत ते उठले नि आत गेले, ते गेलेच ! पुढे बाबारावांनी त्यांना त्याच मागणीचे एक नोंदपत्र मुंबईहून पाठविले. त्याला गांधींनी पुन्हा स्पष्टच उत्तर धाडले की," भगतसिंगादी अत्याचारी राजबंद्यांच्या सुटकेची मागणी करणे मी हीनपणाचे समजतो !"

4 comments:

अनिकेत said...

याबद्दलची आधीक माहीती कुठे वाचायला मिळेल का? उत्सुकता आहे.. अर्थात विशेष नवल वाटले नाही.. गांधींकडुन हे अपेक्षीतच होते. deplomatic :(

Mugdha said...

the legend of bhagat singh madhye he sagala pahayala milala....
bhagat singh vagairenchya prayatnamule bharatala svatantrya milale asate tar kaay jhaale asate ha vichar maajhya manat nehami yeto..
bhagat singh haluhalu gandhijinpekshaahi popular hou laagale hote....this might be one of the reason behind signing that pact...

Pravin said...

तशीही मला गांधी बद्दल कधी आत्मियता नव्हतीच. अगदी शाळेत असताना सुद्धा फक्त अहींसेने स्वातन्त्र्य कसे मिळेल असाच प्रश्न मला पडायचा. माझे तर स्पष्ट मत आहे की जर गांधी नसते तर आपण कदाचीत काही वर्षे अगोदर स्वतंत्र झालो असतो (आणि आजच्या राजकारण्यांनी देशाची अजुन वाट लावली असती). कधी जमल्यास मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक पहा.

ss said...

hi sarv mahiti vachalyavar apan gadhijina rastrapita kas manaycha ? ...........................
.......................................satish , prasad , vilas , sagar , shahaji , hemant , ravi.

Post a Comment