Saturday, August 13, 2011

१४ ऑगस्ट - 'अखंड हिंदुस्थान स्मरण दिन'


कौन यहा है,
जिसे प्राणोसे प्यार नही है
मगर जगतमें जुडा है शुरूसे मित्र,
कहां संहार नही है
ये मृत्यु क्या है, वस्त्र बदलना,
कुच पलका विश्राम साथीयों
जीवन तो एक अखंड परब है,
साधारण त्योहार नही है
जीना सबसे बडी कला है,
मगर ये एक अटल सत्य है,
की मरनेसे डरनेवाले को,
जीनेका अधिकार नही है

या तत्वावर मार्गक्रमण करणार्या असंख्य ज्ञात अज्ञात देशभक्तांचा, क्रांतिकारकांचा अन् अमर हुतात्म्यांचा ज्यादिवशी अपमान झाला हा तो दिवस. १४ ऑगस्ट १९४७ चा. याच दिवशी सिंध प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत आणि पूर्वबंगालचा प्रांत एक क्रूर षडयंत्र रचून विभाजीत करण्यात आला. काँग्रेसचे बुळगट नेतृत्व या अधम षडयंत्राला बळीपडले. काँग्रेसने भारतमातेच्या फाळणीच्या अमुल्य तडजोडीवर स्वातंत्र्य स्विकारले.

भगतसिंग अशा खंडीत पंजाब प्रांतासाठी हुतात्मा झाले होते काय ? खुदीराम बोस अशा भंगलेल्या बंग प्रांताकरताफासावर चढले होते काय ? नाही - नाही ! हे सर्व हुतात्मे त्या अखंड हिंदुस्थानाकरीताच आत्मयज्ञास सिद्ध झालेहोते. या भारत मातेचे विभाजन करण्याचा अधिकार चर्चिल, जिन्ना कॉन्ग्रेसला कोणी दिला ?

म्हणूनच १४ ऑगस्ट हा दिवस 'अखंड हिंदुस्थान स्मरण दिन' म्हणून संबोधला जातो.

Saturday, July 2, 2011

पंजाब शार्दूल उधमसिंग आणि गांधी






पंजाब शार्दुल उधमसिंगांनी फाशीच्या छायेखाली न्यायालयात दाखविलेल्या धिरोदात्त वृत्तीविषयी गांधी म्हणाले,

"उधमसिंगांनी केलेले कृत्य हे वेडेपणाचे होते. असे प्रत्येक कृत्य आपल्या अहिंसक लढ्याची हानी करते. सर मायकेल ओडवायर यांच्याशी आपले मतभेद होते. पण त्यामुळे त्यांच्या हत्ये
संबंधी शोक करण्यात किंवा लेडी ओडवायर नि कुटुंबीय यांच्याशी सहानुभूती दाखविण्यात प्रतिबंध येऊ नये.

मला प्रत्येक हिंदी देशभक्ताने त्या कृत्याविषयी मला वाटणा
र्‍या लज्जेमध्ये आणि तीन इंग्रजांचे प्राण वाचले या वाटणार्‍या माझ्या आनंदात सहभागी व्हावे असे वाटते.

वृत्तपत्रावरून आपणास समजते की, न्यायालयात आणी प्रेक्षकांसमोर उभे असता आरोपी उधमसिंगांनी करमणूक झाल्याप्रमाणे वाटणारी बेपर्वाई दाखविली. पण मला त्याची वाहवा वाटत नाही. माझ्या दृष्टीने ते एक तशाच पुढे चालू राहिलेल्या वेडाचेच चिन्ह होते. आरोपीला आपल्या तथाकथित शौर्याचा नशापान केल्याप्रमाणे मद चढलेलाआहे."
‍ ‍

Monday, May 30, 2011

कसबा पेठेतील पुण्येश्वर महादेव आज कुठे आहे ?


पुणे हे नाव कशावरून पडले ? पूर्वी याला पुण्य विषय म्हणत असत हे आपण बघितले. पुण्यामध्ये पुर्वी पुण्येश्वर महादेवाचे मंदीर होते. ज्यावरून पुण्य विषय अर्थात पुणे हे नाव प्रचलित झाले. आज हे नाव असलेली जागा आहे, पण पुण्येश्वराची वास्तू कुठे आहे ? त्या वास्तूवर आज काय आहे ? ज्या नावावरून पुणे नाव विख्यात आहे तो पुण्येश्वर महादेव आज कुठे आहे ?

कसबा पेठेतील कुंभार आळी भाग. या जवळ पुण्येश्वर चौक ही जागा आजही दाखवली जाते. फक्त नाव आज कसेबसे शिल्लक आहे. पण तो महादेव कुठे आहे ?

धाकटा शेख सल्ला दर्गा आणि थोरला शेख सल्ला दर्गा असे दोन आज विद्यमान आहेत. जेथे पुण्येश्वर महादेव होता तेथे थोरला शेख सल्ला दर्गा आहे. जेथे केदारेश्वर महादेव होता तेथे धाकटा शेख सल्ला दर्गा आहे. गेल्या पावसाळ्यांत नव्या पूला खालील धाकटा शेख सल्ला दर्ग्याचे नदीकाठचे तटबंदीचे बांधकाम ढासळले. त्या ढीगार्यांतून हेमाडपंथी धाटणीचे खांब आणि मंदीरांचे अवशेष आढळले. दैनिक सकाळने या बातमीची प्रसिद्धी तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये केलेली होती. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी यात परिश्रमपूर्वक संशोधनकरून हे अवशेष मूळ केदारेश्वराचेच असल्याचा दाखला दिलेला होता. सध्या हे सर्व अवशेष भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे सुरक्षीत आहेत. जिज्ञासूंनी जावून या कलात्मक वैभवाचे अवशेष समक्ष जावून पाहावेत.

Sunday, August 29, 2010

पंजाब शार्दूल सरदार उधमसिंग


"ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या टांचेखाली लोकांना उपाशी मरतांना मी हिंदुस्थानात पाहिलेले आहे. अमृतसर येथे जनरल डायरने ओडवायरच्या अधिपत्याखाली केलेल्या अमानुष कत्तलीची दृष्ये मी प्रत्यक्षात पाहिलेली आहेत....ओडवायरचा वध करून हा प्रतिशोध मी घेतला नसता, तर हिंदुस्थानच्या नावाला कलंक लागला असता. तुमच्या फाशीच्या शिक्षेची मला पर्वा नाही. मी माझ्या देशासाठी बलिदान करीत आहे. वंदे मातरम् !"

पंजाब शार्दूल सरदार उधमसिंग

Tuesday, July 6, 2010

साध्वी ऋतंभरादेवीकृत अमरकाव्य

साफ उठादो अब दुकाने यहाँसे काले धंदोंकी

दाल हरगीज गलने देना अब स्वार्थकें अंधोंकी

सबसे कहदों के ये धरती हैं आजादींके बंदोंकी

भगतसिंहकें इस भारतमें जगह नहीं जयचंदोंकी

अब चलेगा काम दोसतो केवल जयजयकारोंसे

संभलकें रहना अपने देशमें छिपे हुए गद्दारोंसे

- साध्वी ऋतंभरादेवीकृत अमरकाव्य

Tuesday, May 25, 2010

माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


इतक्यात एक लोखंडी बिल्ला आणून शिपायाने हातात दिला. हा तो बंदीवानाच्या छातीवर रूळणारा क्रमांक ! त्या बिल्ल्यावर बंदिवानाची सुटकेची मिति दिलेली असते. माझी मिति ! मला सुटका तरी आहे का ? का मरण हीच माझ्या सुटकेची मिति ? काही औत्सुक्य, काही निराशा, काही विनोद अशा मिश्र भावनेने मी बिल्ल्याकडे पाहिले. सुटकेचे वर्ष १९६० इसवी ! क्षणभर त्याचा अर्थ काहीच प्रकाशला नाही. क्षणा दो क्षणात त्यातील भयंकर अर्थ प्रकाशला ! शिक्षा १९१० व्या वर्षी नि सुटका १९६० व्या वर्षी !

...... निष्ठुर विनोदाने म्हणाला, "काही चिंता नाही. दयाळू सरकार तुम्हाला १९६० साली सोडीलच सोडील."

मी उपहासत म्हणालो, "पण मृत्यु अधिक दयाळु आहे. त्याने मला त्यापूर्वीच सोडून दिले तर !"

दोघेही हसलो. तो सहज हसला. मी प्रयत्नपूर्वक हसलो. सुपरिटेंडंट आणखी काही चर्चा करून गेला. मी खाली बसलो. सर्वजण निघून गेले. मी नि माझी शिक्षा असे दोघेच एकटे उरलो. आणि त्या उदास कोठडीत एकमेकांच्या तोंडास तोंड देऊन निरखू लागलो.

- माझी जन्मठेप
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Saturday, April 17, 2010

हम बुलबुले हैं क्या ????


फाळणी झाल्यानंतर हिंदुस्थानातून एक गितकार इकबाल महंमद हा पाकिस्तानात निघून गेला. पूर्वी या अभाग्याने एक गीत लिहिलेले होते जे फाळणीनंतर डोक्यावर घेतले गेले. ते गीत होते,

"सारे जहाँसे अच्छा ! हिंदोस्ताँ हँमारा !
हम बुलबुले हैं इसकी ! ये गुलसिताँ हँमारा !!"

हे गीत लिहिणारा मात्र खरच बुलबुल होता जो फाळणी नंतर भुर्रकनपाकिस्तानात उडाला. मग त्याला तो "सारे जहा से अच्छा" असा हिंदुस्थान परका उपरा वाटू लागला.

दुर्दैव हे कि आमच्या हिंदु पिढीला बालपणापासूनच दूरचित्रवाणी आकाशवाणीच्या माध्यमातून या गीताचे डोस बाळकडू पाजल्यासारखे दिले गेले. त्या मध्ये समग्र हिंदुंना "बुलबुल" या भिकार पक्षाची उपमा दिली गेली. बुलबुल हे कशाचे प्रतिक आहे, हे मी वेगळे सांगायला नको. हिंदी चित्रपटातील भिकार गाणी काढलीत तर बुलबुल कशाचे प्रतिक आहे हे आपल्या झटकन लक्षात येईल.

आम्ही बुलबुल आहोत काय ? जगाला ठाऊक आहे की हिंदु जाती ही एका महान संस्कृतीची आणि दिव्यात्म्यांची उत्तराधिकारी आहे. ही रामसंस्कृती, कृष्णसंस्कृती, भरत, भगिरथ, विक्रमादित्य, दधिची, विश्वामित्र, परशुराम, आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सारख्या असंख्य दिव्य विभूतींनी ज्या भारत देशात जन्म घेतला ते सर्व आम्ही, एका उज्वल परंपरेचे उत्तराधिकारी - बुलबुले आहोत काय ? लाज नाही वाटत का असे उच्चारायला ?

खुशाल शाळेत शिकवले जाते, फार पूर्वी जेव्हा भारतवर्षातून सोन्याचा धूर निघत होता, तेव्हा जगभरातले चोरटे, बलात्कारी, लफंगे भारत मातेला "सोने की चिडीया" म्हणून संबोधत होते. परम पवित्र भारत मातेला तुम्ही 'सोने कि चिडीया' म्हणून संबोधताना नव्या पिढीला हे बाळकडू पाजताना
तुम्हाला संकोचाचा अनुभव आला नाही ? काय शडयंत्र आहे हे ? काय शिकवायचा प्रयत्न आहे हा आम्हाला ?

नविन पिढीला हे शिकवायला संकोच वाटतो का की
तुम्ही,
"नाभिषेको संस्कारः सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥"

हे सांगणार्‍या विक्रमादित्याचे वंशज आहात. बुलबुल नाही तर नरकेसरीआहात. नरसिंह आहात. पराक्रमाचा डंका वाजवा. आपल्या सारे जहासे अच्छा असणार्‍या हिंदुस्थानला पुन्हा अखंड करा.
" ‍ ‍